Jitendra Awhad : ज्याने अर्वाच्य भाषेत शिव्या अन् धमकी दिली त्यालाच Tv9 चा थेट कॉल, आव्हाडांबाबत विचारताच बघा काय म्हणाला?
जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा मेसेज करणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि त्याने ज्या नंबरवरून धमकी दिली. तो नंबर जितेंद्र आव्हाडांनीच मेसेजसह ट्वीट केलाय. यानंतर tv9 मराठीच्या प्रतिनिधीनं धमकी दिलेल्या व्यक्तीशी संवाद साधला आहे.
शरद पवार गट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. जितेंद्र आव्हाज यांना मोबाईलवर धमकीचा मेसेज देण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत या धमकी संदर्भात माहिती दिली आहे. विधान भवनात असताना त्यांना धमकी देणारा मेसेज आल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांना देण्यात आलेली धमकी आणि ते मेसेज त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. यावेळी त्या मेसेजचा स्क्रीन शॉट टाकत धमकीचा मेसेज मला आता विधानभवनात असतांना आला असं म्हणत महाराष्ट्रात काय सुरू आहे…? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला. ज्या नंबरवरून आव्हाडांना धमकी देण्यात आली तो मोबाईल नंबरही त्यांनी शेअर केलाय. यासह एक फोटो शेअर करत मला अर्वाच्य भाषेत जीवे मारण्याच्या धमक्या देणारा हाच तो अमर कोळी… त्याच्यावर काय कारवाई करणार? असा सवाल विधानसभाध्यक्षांना आव्हाडांनी केलाय. या सगळ्या प्रकारानंतर आव्हाडांना धमकी देणाऱ्या व्यक्तीशी टीव्ही ९ मराठीने संवाद साधलाय.
