राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, विरोधी पक्षनेते अजित पवार काय म्हणाले?

| Updated on: Mar 24, 2023 | 4:04 PM

VIDEO | तसंच राहुल गांधी यांच्या सोबत हे सरकार वागतंय; अजित पवार यांनी जुना संदर्भ देऊन स्पष्टच सांगितलं…

Follow us on

मुंबई : कॉंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर लोकसभा अध्यक्षांनी कारवाई केली आहे, यावर विरोधी पक्षाचे नेते अजित पवार यांनी भाष्य केले आहे. ‘लोकसभेमध्ये ही दुसरी घटना घडली आहे. काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मोहम्मद फैजल यांनाहीअशाच पद्धतीने खासदार पदावरून काढून टाकण्यात आलं होतं. आणि आज राहुल गांधी यांना काढून टाकण्यात आले. मतमतांतर असू शकतात, राजकीय पक्षांच्या वैचारिक भूमिका वेगवेगळ्या असू शकतात परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपर्यंत अशी खासदारकी रद्द करण्याचा निर्णय झाला नव्हता,’, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. तर खासदारकीबाबत अशा पद्धतीने कारवाई करणे हे संविधान आणि लोकशाहीमध्ये बसत नाही. प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार असला पाहिजे तो संविधानाने दिलेला आहे तरीही अशी कारवाई होते हे योग्य नाही, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.