Ajit Pawar Video : ‘तर मग मी मागे पुढे बघणार नाही…’, धनंजय मुंडेंसमोरच अजितदादांचा खंडणीवरून दम वजा इशारा

Ajit Pawar Video : ‘तर मग मी मागे पुढे बघणार नाही…’, धनंजय मुंडेंसमोरच अजितदादांचा खंडणीवरून दम वजा इशारा

| Updated on: Jan 31, 2025 | 11:27 AM

बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीआधी अजित पवार यांनी खंडाणीच्या आरोपांवर धनंजय मुंडे यांच्या समोरच जमलेल्या सर्वांनाच दम वजा इशारा दिला. दुसरीकडे डीपीडीसीतल्या सदस्यांवरून अजित पवार यांनी धसांनाही धक्का दिल्याचं बोललं जातंय.

ज्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर खंडणीची बैठक झाल्याचा आरोप सुरेश धसांनी केलाय त्याच मुंडे समोर बीडच्या पहिल्याच बैठकीत अजित पवार यांनी खंडणीचे आरोप आणि बंदूकशाहीवरून समर्थकांना दम वजा इशारा दिला. बैठकीच्या पूर्वसंध्येलाच जिल्हा नियोजन समिती निधीतून 73 कोटी बोगसपणे उचलले गेल्याचा आरोप सुरेश धसांनी केला होता. त्याचा पेनड्राईव्ह अजित पवारांकडे सुपूर्द केल्याचा दावा धसांनी केलाय. दरम्यान धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून अजित पवार यांनी जी भूमिका मांडली आहे तीच आमची अधिकृत भूमिका असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटल्याने राजीनामाच्या निर्णयाचा चेंडू पुन्हा अजित पवारांच्या कोर्टात टाकल्याची चर्चा आहे. मुंडेवर विविध आरोपांनंतर अजित पवार यांनी सामूहिक दम दिला असेल तरी मात्र धनंजय मुंडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत याचंही संकेत दिले गेले.

बीड जिल्हा नियोजन समितीच्या विधीमंडळ सदस्य मधून नामनिर्देशित करायच्या दोन सदस्यांच्या नावात अजित पवार यांनी बदल केला. भाजप आमदार सुरेश धस आणि त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या जागी आमदार विजयसिंह पंडित आणि भाजपच्या कोट्यातून नमिता मुंडे यांची नियुक्ती केली. यामुळे भविष्यात निधी वाटपावरून वाद जरी झाला तरी त्या प्रक्रियेत धस आणि सोळंके यांना मतदानाचा अधिकार असणार नाही. अजित पवार यांनी बीडमध्ये जाऊन आपल्या नेहमीच्या स्टाईलने दम दिला असला तरी विविध घोटाळ्यांचे आरोप सत्ताधारी नेत्यांकडूनच होत आहेत. पीक विमा घोटाळा संदर्भात धाराशिवचा जिल्हाधिकारी अहवालही दिलाय. गैरव्यवहार झाल्याची कबुली कृषीमंत्री माणिकराव ठाकरे यांनी ही दिली आहे पण त्यावर कारवाई का नाही? असा सवाल विरोधक विचारतायत.

Published on: Jan 31, 2025 11:27 AM