Nawab Malik : Aryan Khan ला हायकोर्टाकडून अखेर जामीन मंजूर, नवाब मलिक यांची प्रतिक्रिया

Nawab Malik : Aryan Khan ला हायकोर्टाकडून अखेर जामीन मंजूर, नवाब मलिक यांची प्रतिक्रिया

| Edited By: | Updated on: Oct 28, 2021 | 6:16 PM

आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना 'तुरुंगात टाकणारा आज तुरुंगात जायला घाबरतोय,' असा टोला लगावला आहे.

क्रूझ ड्रग्स प्रकरणात अखेर 25 दिवसानंतर अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन मिळाला आहे. तीन दिवस दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाकडून आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. उद्या उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत प्राप्त होईल. त्यानंतर उद्या किंवा शनिवारी हे तिघे कारागृहाबाहेर येतील. दरम्यान, आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना जोरदार टोला लगावलाय. तुरुंगात टाकणारा आज तुरुंगात जायला घाबरतोय, अशी टीका मलिक यांनी वानखेडेंवर केलीय.