Video | चित्त्यांना खायला ‘हे’ देता? एवढी क्रूरता? राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आगपाखड

| Updated on: Sep 20, 2022 | 2:24 PM

इतर प्राणी संग्रहालयात जो आहार दिला जातो, तोच द्यायला पाहिजे... पण त्याऐवजी भारतीय काळवीट जिवंतपणे चित्त्यांसमोर खायला ठेवता, हे चुकीचं असल्याचं मत जयंत पाटील यांनी मांडलं.

Follow us on

मुंबईः नामिबियातून आणलेल्या चित्त्यांवरून केंद्र सराकरमधील भाजपविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी चित्त्यांना देण्यात येणाऱ्या आहारावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. चित्त्यांना (Cheetah) खाण्यासाठी जिवंत काळवीट सोडणं ही क्रूरता असल्याचं त्यांनी म्हटलं. इतर प्राणी संग्रहालयात जो आहार दिला जातो, तोच द्यायला पाहिजे… पण त्याऐवजी भारतीय काळवीट जिवंतपणे चित्त्यांसमोर खायला ठेवता, हे चुकीचं असल्याचं मत जयंत पाटील यांनी मांडलं. तर अजित पवार (Ajit Pawar) यांनीही यावरून केंद्र सरकारवर टीका केली.

तर, बऱ्याचदा दुर्दैवाने, महाराष्ट्रात जे महत्त्वाचे प्रश्न असतात, याला व्यवस्थित बाजूला ठेवून तिसरेच प्रश्न पुढे आणतात. चित्ते आले ठिक आहे… पण यातून रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का, याऐवजी वेदांताचा प्रश्न सुटतील का, असा सवाल अजित पवार यांनी केला.