Devgiri Bungalow | देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
राष्ट्रवादीची धुरा एका नव्या हातात म्हणजे सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्याची प्रक्रिया आज होतेय. कारण अजित पवार यांच्या जाण्यानंतर सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत, अशी माहिती मिळत आहे. मात्र दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची विधिमंडळात बैठक होणार आहे.
राष्ट्रवादीची धुरा एका नव्या हातात म्हणजे सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्याची प्रक्रिया आज होतेय. कारण अजित पवार यांच्या जाण्यानंतर सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत, अशी माहिती मिळत आहे. मात्र दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची विधिमंडळात बैठक होणार आहे, त्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची गटनेते पदी नियुक्ती केली जाईल. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी सुद्धा सुनेत्रा पवार यांच्याकडे दिली जाणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी दाखल झाले आहेत. नेमके काय निर्णय घेतले जातील याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Published on: Jan 31, 2026 12:40 PM
