पाटील आहात जोशी भुवांचं काम कधीपासून करतात ? Chhagan Bhujbal यांचा चंद्रकांतदादांना टोला

पाटील आहात जोशी भुवांचं काम कधीपासून करतात ? Chhagan Bhujbal यांचा चंद्रकांतदादांना टोला

| Edited By: | Updated on: Feb 13, 2022 | 7:39 PM

राज्यातीलच नव्हे तर देशातील अनेक ठिकाणची सरकारं पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्यात ते कधीच यशस्वी होणार नाहीत, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच गोव्यात उद्या मतदान होत आहे. गोव्यात भाजप सोडून सर्वच सत्तेवर येतील, असा छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी आज येथे केला आहे.

पुणे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी येत्या 10 मार्चनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) कोसळणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या भविष्यवाणीची राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार खिल्ली उडवली आहे. तुम्ही पाटील आहात. जोशीबुवांचं काम कधीपासून करायला लागलात? असा खोचक सवाल छगन भुजबळ यांनी पाटील यांना केला आहे. राज्यातीलच नव्हे तर देशातील अनेक ठिकाणची सरकारं पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्यात ते कधीच यशस्वी होणार नाहीत, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच गोव्यात उद्या मतदान होत आहे. गोव्यात भाजप सोडून सर्वच सत्तेवर येतील, असा छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी आज येथे केला आहे. ते मीडियाशी बोलत होते.