ईव्हेंट आणि ईडीचं सरकार म्हणजे शिंदे-फडणवीस सरकार

ईव्हेंट आणि ईडीचं सरकार म्हणजे शिंदे-फडणवीस सरकार

| Updated on: Sep 02, 2022 | 9:28 AM

आत्महत्या हा काही कोणत्याही गोष्टीवरचा उपाय नाही, त्यामुळे आत्महत्यासारख्या घटनांकडे नागरिकांनी वळू नये असंही त्यांनी बोलताना सांगितले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वांसाठी हा गणेशोत्सव सुख, समृद्धी घेऊन येवो असं साकडंही त्यांनी यावेळी घातलं. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंतामणी राजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी कोरोना काळानंतर मोठ्या जल्लोषात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाच्या आनंदात स्वागत तर केले  आहेच. पण चिंतामणीच्या दर्शनामुळे मनाला सुख आणि आनंदही मिळतो असंही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधताना शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे इव्हेंट आणि ईडीचे सरकार असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. या गणेशोत्सव चतुर्थीनिमित्त मागील वर्षी गणरायाच्या दर्शनावेळी आपल्या आईचा झालेला अपमान सहन न झाल्याने लहान मुलीने आत्महत्या केली होती, त्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, आत्महत्या हा काही कोणत्याही गोष्टीवरचा उपाय नाही, त्यामुळे आत्महत्यासारख्या घटनांकडे नागरिकांनी वळू नये असंही त्यांनी बोलताना सांगितले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वांसाठी हा गणेशोत्सव सुख, समृद्धी घेऊन येवो असं साकडंही त्यांनी यावेळी घातलं.

Published on: Sep 02, 2022 09:28 AM