Jitendra Awhad Video : ‘वाल्मिक खडा तो वो सरकार से बडा, थोडी तरी लाज…’; आव्हाडांचा पुन्हा हल्लाबोल

Jitendra Awhad Video : ‘वाल्मिक खडा तो वो सरकार से बडा, थोडी तरी लाज…’; आव्हाडांचा पुन्हा हल्लाबोल

| Updated on: Jan 27, 2025 | 5:14 PM

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत वाल्मिक कराडवर निशाणा साधला आहे. तर जेलमध्ये असताना वाल्मिक कराडच्या दिमतीला सात हवालदार ठेवलेत, असा आरोप केला आहे.

वाल्मिक खडा तो वो सरकारसे बडा, असं शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत वाल्मिक कराडवर निशाणा साधला आहे. तर जेलमध्ये असताना वाल्मिक कराडच्या दिमतीला सात हवालदार ठेवलेत, असा आरोप केला आहे. इतकंच नाहीतर जेलमध्ये कराडच्या माणसांची मैफिल रंगते असंही जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटच्या माध्यमातून म्हटलंय. ‘हॉस्पिटलमधून बाहेर काढलेल्या वाल्मिक कराडला आता बीडच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. बंदीवासात त्याच्या दिमतीला सात हवालदार तैनात ठेवलेले आहेत. बीडमधील त्याच्या गँगमधील छोटे – मोठे गुन्हेगार मुद्दामहून स्वतःवर एखादा गुन्हा ओढावून घेतात अन् या गुन्हेगारांची रवानगी बीड मध्यवर्ती कारागृहात होते. बीड कारागृहात ते ‘आपोआप’ वाल्मिक कराडच्या जवळ पोहचतात आणि मग, रात्री मस्त मैफिल रंगत असते.’, असा घणाघातही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. पुढे जितेंद्र आव्हाड यांनी असेही म्हटले, एकंदरीत तो कारागृहात आहे, अशी भावनाच त्याच्या मनात निर्माण होऊ द्यायची नाही, असा निर्णय शासन दरबारी झालेला दिसतो. बाकी महाराष्ट्रात आजपर्यंत असे कधी बघितलेले नाही की, कायद्याने जामीन नाकारलेल्या इसमाला एवढे हवालदार दिमतीला तैनात केले आहेत ! अर्थात, तो वाल्मिक कराड आहे… वाल्मिक खडा तो वो सरकारसे बडा !! थोडी तरी लाज बाळगा ! असंही म्हटलं आहे.

Published on: Jan 27, 2025 05:14 PM