Nitesh Rane : शेखच्या कानाखाली बारा.. ; नितेश राणेंचा खोचक निशाणा
मनसेच्या मराठीच्या मुद्यावरून नितेश राणे यांनी जावेद शेख यांच्या मळच्या व्हिडीओवर भाष्य करत टीका केली आहे.
शेखच्या कानाखाली आधी बारा वाजवा मग मराठीच्या मुद्द्यावर बोलू असं मंत्री नितेश राणे यांनी म्हंटलं आहे. मनसेचे जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेख याच्या कृत्यावरती नितेश राणे यांनी हा निशाणा साधला. गरीब हिंदूंवरच मराठी भाषेची सक्ती कशासाठी असं देखील नितेश राणे यांनी म्हंटलं आहे.
यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांनी म्हंटलं की, अन्य लोक, गरीब हिंदूंवरच तुम्ही मराठीची सक्ती करता. पण कोण शेख हा तुमच्याच पक्षाचा आहे. त्याचे कधी कान फोडवणार आता? त्याच्या कानाखाली कधी बारा वाजवणार? की शेख तुमच्या पक्षात असला म्हणजे त्याला वेगळा नये आहे? आमचा हाच मुद्दा आहे की, हे गोल टोपी आणि दाढीवले लोक हे कधीही मराठी बोलायला बघत नाही. मग न्याय फक्त गरीब हिंदूंनाच का लागतो आहे? त्यानंच कशाला कान फोडायला लागत आहे. पहिले त्या शेखच्या कानाखाली बारा वाजवा नंतर आपण मराठीच्या सक्तीवर चर्चा करू, अशी खोचक प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे.
