OBC Reservation: भाजपचे वराती मागून घोडे, वडेट्टीवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांशी आधीच चर्चा झालीय!

| Updated on: Jun 21, 2021 | 12:04 PM

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे. आम्ही मंत्री असलो तरी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ देणार नाही. असं वडेट्टीवर यांनी म्हटले आहे.

Follow us on

एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा असतानाच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे. आम्ही मंत्री असलो तरी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. तसेच निवडणुका न घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. ही चर्चा सकारात्मक होती, असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका न घेण्याबाबत मुख्यमंत्रीही सकारात्मक असल्याची जोरदार चर्चा आहे. वड्डेटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे मोठ विधान केलं.