Mayor Reservation Lottery | मुंबईत आवाज भाजपचाच… खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव; आता रस्सीखेच सुरू
मुंबईचा महापौरपद कुठल्या प्रवर्गाला मिळणार? याकडे सगळ्यांच लक्ष लागलं होतं. अखेर आरक्षण सोडतीत खुल्या वर्गाला म्हणजे ओपन कॅटेगरीला मुंबईच महापौरपद मिळणार हे स्पष्ट झालं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चाचपणी सुरु झाली आहे.
मुंबईसह 29 महानगरपालिकांसाठी आज मंत्रालयात आरक्षण सोडत सुरु आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सोडत प्रक्रिया सुरु आहे. मुंबईचा महापौरपद कुठल्या प्रवर्गाला मिळणार? याकडे सगळ्यांच लक्ष लागलं होतं. अखेर आरक्षण सोडतीत खुल्या वर्गाला म्हणजे ओपन कॅटेगरीला मुंबईच महापौरपद मिळणार हे स्पष्ट झालं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चाचपणी सुरु झाली आहे. भाजपचा महापौरपद बसवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खुल्या प्रवर्गात 17 पैकी 9 महापालिकांमध्ये महिला महापौर बसणार हे निश्चित झालं आहे.
Published on: Jan 22, 2026 01:25 PM
