Special Report | Hijab वरून आंदोलन सुरुच…वाद कधी थांबणार?-TV9
पाकिस्तानच्या या मंत्र्यांना एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी चांगलेच सुनावले आहे. पाकिस्तानने भारताच्या अंतर्गत बाबींवर लक्ष देऊ नये. पाकने भारतामध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादावर प्रतिक्रिया देण्यापूर्वी आधी स्वत:चे घर व्यवस्थित सांभाळावे असा टोला ओवेसी यांनी लगावला आहे.
नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये सुरू झालेला हिजाबचा वाद आता चांगलाच पेटला आहे. हिजाबवरून देशभरात निर्देशने होत आहेत. दरम्यान भारतामध्ये सुरू असलेल्या या वादात आता पाकिस्तानने देखील उडी घेतली आहे. पाकिस्तानच्या काही मंत्र्यांनी यावरून भारतावर टीका केली आहे. पाकिस्तानच्या या मंत्र्यांना एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी चांगलेच सुनावले आहे. पाकिस्तानने भारताच्या अंतर्गत बाबींवर लक्ष देऊ नये. पाकने भारतामध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादावर प्रतिक्रिया देण्यापूर्वी आधी स्वत:चे घर व्यवस्थित सांभाळावे असा टोला ओवेसी यांनी लगावला आहे. ओवेसी म्हणाले की, मलालावर पाकिस्तानात हल्ला झाला आणि तिला पाकिस्तान सोडावे लागले. पाकिस्तानचे संविधान गैर-मुस्लिम व्यक्तीला पंतप्रधान बनू देत नाही. पाकिस्तानला माझा सल्ला आहे, इधर मत देखो… उधर ही देखो असे ओवेसी यांनी म्हटले आहे. ते उत्तर प्रदेशमधील एका मतदारसंघात प्रचारसभेत बोलत होते.
