Sanjay Raut | कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट; संजय राऊत यांनी थेट भाजपलाच घेरलं

Sanjay Raut | कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट; संजय राऊत यांनी थेट भाजपलाच घेरलं

| Updated on: Jan 27, 2026 | 11:13 AM

पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांच्या यादीत उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी यांचे देखील नाव आहे. कोश्यारी यांना पद्म पुरस्कार मिळाल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भगतसिंग कोश्यारी यांना जाहीर झालेल्या पद्मभूषण पुरस्काराचा निषेध केला आहे.

केंद्र सरकारने 2026 या वर्षासाठी 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. या पुरस्कारांमध्ये पाच पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री यांचा समावेश आहे. पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांच्या यादीत उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी यांचे देखील नाव आहे. कोश्यारी यांना पद्म पुरस्कार मिळाल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भगतसिंग कोश्यारी यांना जाहीर झालेल्या पद्मभूषण पुरस्काराचा निषेध केला आहे. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कोश्यारींना पद्मभूषण का दिला जातोय? असा संतप्त सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कोश्यारींना पुरस्कार दिला जातोय. यावर भाजप नेते सारवासारव करत याचं समर्थन करणार असतील तर त्यांना महाराष्ट्र हे नाव तोंडात घेण्याचा अधिकार आहे का? असा सवालच राऊत यांनी भाजप नेत्यांना केला आहे. तसेच महापुरुषांचा अपमान करणे ही भाजपची जुनीच परंपरा असल्याचा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.

Published on: Jan 27, 2026 11:13 AM