Pahalgam Terror Attack : पहलगामच्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हाशिम मुसा, NIA च्या रिपोर्टमध्ये काय?

Pahalgam Terror Attack : पहलगामच्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हाशिम मुसा, NIA च्या रिपोर्टमध्ये काय?

| Updated on: May 02, 2025 | 1:23 PM

पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानच्या कटाचे पुरावे एनआयएला तपासात मिळाले असून यात हाशिम मुसाचा उल्लेख करण्यात आलेला आहे.

पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानच्या कटाचे पुरावे एनआयएला तपासात मिळाले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. या हल्ल्यात पाक दहशतवादी संघटना लष्कर, आयएसआय, पाकिस्तान आर्मीच्या षडयंत्राचे पुरावे सापडलेले आहेत. दहशतवाद्यांनी बेताब खोऱ्यात शस्त्र लपवले होते, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आलेली आहे. एनआयएच्या प्राथमिक अहवालात हाशिम मुसा आणि अली भाई उर्फ तल्हा भाईचा उल्लेख असल्याचं सूत्रांनी सांगितल. हे दोघ पाकिस्तानचे रहिवासी आहेत, असंही सुत्रांकडून सांगण्यात आलं आहे. एनआयएच्या प्राथमिक अहवालात PoK चा उल्लेख देखील आहे. दहशतवादी PoK मध्ये आपल्या हँडलर सोबत संपर्कात होते. पाकिस्तानातून दहशतवाड्यांना दिशा निर्देश देण्यात येत होते. आयएसआयच्या इशाऱ्यावरून लष्कराच्या हेड क्वार्टरमध्ये षडयंत्र रचण्यात आल्याची माहिती देखील सूत्रांनी दिलेली आहे.

Published on: May 02, 2025 01:23 PM