Pakistan : ‘ही आमची चूक, याची किंमत…’; पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची दहशतवादावर मोठी कबुली

Pakistan : ‘ही आमची चूक, याची किंमत…’; पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची दहशतवादावर मोठी कबुली

| Updated on: Apr 25, 2025 | 7:18 PM

Jammu Kashmir Terror Attack: पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, पाकिस्तान हे काम गेल्या 30 वर्षांपासून करत आहे.

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी मोठं विधान केले आहे. एका मुलाखतीदरम्यान बोलताना ख्वाजा यांनी पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याची कबुली दिली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा यांनीही कबूल केले की, पाकिस्तान गेल्या ३० वर्षांपासून दहशतवादाला आर्थिक मदत करत आहे. पाकिस्तानचे रक्षा मंत्री ख्वाजा असिफ यांनी ही मोठी कबुली देत ३० वर्ष दहशतवाद्यांना पाकिस्तानने मदत पुरवली असल्याचे म्हटलंय. इतकंच नाहीतर पाकिस्तान दहशतवाद्यांना फंडिंग करत होता अशीही कबुली रक्षा मंत्री ख्वाजा असिफ यांनी दिली. तर ही आमची चूक होती, आम्हाला याची मोठी किंमत मोजावी लागली, असं रक्षा मंत्री ख्वाजा असिफ यांच्याकडून सांगण्यात आलंय. अमेरिकेतील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य ख्वाजा असिफ यांनी केलंय.

Published on: Apr 25, 2025 07:18 PM