Operation Sindoor : भारताच्या हल्ल्याला कोणतंही प्रत्युत्तर देऊ नका कारण…, अमेरिकेकडून पाकिस्तानला थेट इशारा

Operation Sindoor : भारताच्या हल्ल्याला कोणतंही प्रत्युत्तर देऊ नका कारण…, अमेरिकेकडून पाकिस्तानला थेट इशारा

| Updated on: May 07, 2025 | 9:44 AM

पाकिस्तानच्या हद्दीत असलेले ९ दहशतवादी अड्डे मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास भारताच्या लष्कराने एअर स्ट्राईकच्या माध्यमातून उडवलेले आहे आणि कित्येक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. या कारवाईत भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ दहशतवादी तळांवर मध्यरात्री क्षेपणास्त्र हल्ले केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, भारताकडून घेण्यात आलेल्या या अॅक्शनवर जगभरातील नेते प्रतिक्रिया देत असताना थेट अमेरिकेतून पाकिस्तानलाच इशारा देण्यात आला आहे. भारताच्या हल्ल्याला कोणतंही प्रत्युत्तर देऊ नका, असा थेट इशारच अमेरिकेच्या पारराष्ट्रमंत्री रूबियो यांनी पाकिस्तानला दिला आहे. भारतासोबत कोणतंही युद्ध करू नका, असं अमेरिकेकडून पाकिस्तानला सांगितलं जात असून भारताला दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याचा अधिकार आहे, असे देखील अमेरिकेच्या पारराष्ट्रमंत्री रूबियो यांनी पाकिस्तानला सांगितलं आहे. संयुक्त राष्ट्र समितीकडून देखील पाकिस्तान अशाच प्रकारे सूचना करण्यात आली आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सध्या संयुक्त राष्ट्र समितीच्या अधिकाऱ्यांसह अमेरिकेचे अध्यक्ष संवाद साधत आहेत. यावेळीच भारताला कोणतंही प्रत्युत्तर देऊ नका आणि युद्ध करू नका असा सल्लाच पाकिस्तानला देण्यात आला आहे.

Published on: May 07, 2025 09:44 AM