Pahalgam Attack : सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते.. पहलगामचा मन सुन्न करणारा व्हीडीओ

Pahalgam Attack : सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते.. पहलगामचा मन सुन्न करणारा व्हीडीओ

| Updated on: Apr 23, 2025 | 2:16 PM

pahalgam terror attack video : हलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात आतंकवादी हे भारतीय सैन्याच्या वेशात आलेले होते. त्यामुळे घटनेनंतर भारतीय सैन्याचे जवान याठिकाणी दाखल झाल्यावर त्यांना पाहून पर्यटक भयभीत झाले.

जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमधील पहलगाम येथे काल दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 26 पर्यटकांना निर्घृणपणे त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या. हे चारही दहशतवादी भारतीय सैन्याच्या वेशात घटनास्थळी आल्याने कोणालाही त्यांच्यावर संशय आला नाही. 26 जणांची हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी या ठिकाणाहून पळ काढला. त्यानंतर मात्र भारतीय सैन्य दलातील जवान या ठिकाणी दाखल झाल्यावर पर्यटकांना दहशतवादी पुन्हा आल्याची भीती वाटली. यावेळी आम्हाला सोडून द्या म्हणत पर्यटकांनी एकच गोंधळ घातला, जिवाची भीक मागितली.. या संपूर्ण घटनेचा मन हेलावणारा एक व्हिडीओ समोर आला आहे.

Published on: Apr 23, 2025 02:16 PM