Pahalgam Terror Attack : मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याच्या मास्टरप्लानचं टुलकिट सापडलं

Pahalgam Terror Attack : मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याच्या मास्टरप्लानचं टुलकिट सापडलं

| Updated on: May 01, 2025 | 12:40 PM

Jammu Kashmir : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा कट कसा रचला गेला याबाबत एनआयएच्या हाती आता संपूर्ण हल्ल्याच्या नियोजनाचं टुलकिट लागलं आहे. त्याबद्दल अधिक तपास केला जात आहे.

पहलगाम हल्ल्याच्या कटाची संपूर्ण माहिती असणारं टुलकिट आता आढळून आलं आहे. पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यासंदर्भात सापडलेल्या या टुलकिटची एनआयएकडून चौकशी करण्यात सुरू आहे. या टुलकिटमध्ये प्रवासाचा मार्ग आणि राहण्याची ठिकाणाची माहिती अशी महत्वपूर्ण माहिती, सुरक्षा एजन्सिपासून बचाव करण्याची रणनीती सुद्धा या टुलकिटमध्ये असल्याचं समोर आलं आहे. टेलिग्रामवरील द रेजिस्टन्स टाईम्स ग्रुपमध्ये ही टुलकिट आढळून आलं आहे. त्यामुळे आता या टुलकिटच्या माध्यमातून पहलगाम हल्ल्यासंदर्भात मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

Published on: May 01, 2025 12:40 PM