Aadesh Bandekar Meet Aaji | सांगलीत शंभरीच्या आजींना आदेश बांदेकरांकडून पैठणी
सांगलीतील या अजीबाईचे अनोखे प्रेम ऐकून आदेश बांदेकर यांनी थेट सांगली गाठत या आजीबाईंची भेट घेतली. साक्षात आदेश बांदेकर यांना पाहून आजींना आश्चर्य वाटलंच शिवाय त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळच हास्य आणि समाधान निर्माण झाले. यावेळी आदेश बांदेकर यांच्या गळ्यात पडून आजीबाईंची आपला आनंद व्यक्त केला.
सांगली : झी मराठीवरच्या होम मिनिस्टर (Home Minister) कार्यक्रमात सहभागी होण्याची अनेकांची इच्छा असते. काहींची ती इच्छा काहीवेळेला पूर्ण होते. तर काहीजणी त्याची वाट पाहत राहतात. एका आजीबाईंची ही इच्छा वयाच्या 99 वर्षी पूर्ण झाली. टिव्हीसमोर होममिनिस्टर लागल्यावर आदेश बांदेकर (Adesh Bandekar) यांना पाहून आदेश समोर असल्याचा भास करीत गाणे म्हणणाऱ्या नलिनी जोशी (Nalini Joshi) या 99 वर्षीय आजीची आज आदेश बांदेकर यांनी सांगलीत भेट घेतली. निमित्त होते आजीच्या 100 तील पदार्पण कार्यक्रमाचे. यावेळी समक्ष आदेश बांदेकर यांना पाहून आजीही आवक झाल्या. यावेळी आदेश बांदेकर यांनी आजीला पैठणी सुद्धा भेट देत तिचा सन्मान केला.
Published on: May 28, 2022 07:59 PM
