India-Pakistan Conflict : पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन; आखनूर भागात गोळीबार
पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये सीमेवर तणाव वाढत आहे. पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार केला जात आहे.
पाकिस्तानकडून 7 ते 8 वर्षांनी युद्धबंदीचं उल्लंघन झालं आहे. जम्मू काश्मीरच्या आखनूर भागात गोळीबार झाला आहे. रात्रीच्या सुमारास 10 ते 12 राऊंड फायर झाल्याचा दावा स्थानिकांनी केलेला आहे. गोळीबार झाल्यानंतर आखनूर भागातील नागरिक सध्या अलर्ट मोडवर आहेत. तर आखनूरचे नागरिक भारतीय सैन्यासोबत लढणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिक राजू सिंग यांनी दिली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. त्यानंतर सीमेवर सातत्याने पाकिस्तानकडून कुरापातीकरून भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Published on: Apr 30, 2025 02:10 PM
