Shehbaz Sharif : ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकची मस्ती जिरेना, 80 विमानं अन् भारताची पूर्वी तयारी… पंतप्रधानांचा कांगावा सुरूच

Shehbaz Sharif : ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकची मस्ती जिरेना, 80 विमानं अन् भारताची पूर्वी तयारी… पंतप्रधानांचा कांगावा सुरूच

| Updated on: May 08, 2025 | 7:30 AM

बुधवारी पाक संसदेच्या अधिवेशनाला संबोधित करताना पाकिस्तानी पंतप्रधानांनी दावा केला की हल्ल्यादरम्यान पाकिस्तानी सुरक्षा दलांनी पाच भारतीय विमाने पाडल्याचा दावा केला. पण या समर्थनार्थ कोणताही पुरावा पाक देऊ शकला नाही किंवा भारतीय विमानांचे अवशेष कुठे पडले हे पाक सांगू शकला नाही.

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताकडून पाकिस्तानवर ९ ठिकाणी करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी चांगलाच कांगावा केल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तानच्या संसदेत बोलत असताना त्यांनी पाकिस्तानच्या जनतेला या हल्ल्याबद्दल खोटी माहिती दिली. भारताने पाकिस्तानवर ८० विमानांच्या सहाय्याने हल्ला केला. इतकंच नाहीतर भारताकडून या हल्ल्याची पूर्व तयारी करण्यात आली असून पाकिस्तानच्या ६ जागांवर त्यांनी हा हल्ला केल्याची माहिती शहाबाज शरीफ यांनी दिली. तर पाकिस्तानकडे न्यूक्लिअर ताकद आहे, अशी पोकळ धमकी देखील पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी दिली.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटले, भारताने ८० लढाऊ विमानांनी हल्ला केला पण हल्ल्याच्या लगेच तोंड देत पाकिस्तानी सैन्याने लगेचच प्रत्युत्तर दिले. भारताच्या हल्ल्यानंतर तीव्र तणावाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी संसदेच्या अधिवेशनाला संबोधित करताना पाकिस्तानी पंतप्रधानांनी हा दावा केला. ते असेही म्हणाले की हल्ल्यादरम्यान पाकिस्तानी सुरक्षा दलांनी पाच भारताची विमाने हानून पाडली.

Published on: May 08, 2025 07:30 AM