Jyoti Malhotra : हम सब एक… पाकिस्तानमधून खूप प्रेम मिळालं… ज्योती मल्होत्राच्या डायरीतून मोठी माहिती उघड
युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या घरातून एक डायरी सापडली आहे. त्याने त्याच्या डायरीत पाकिस्तानबद्दल अनेक धक्कादायक माहिती लिहिली आहे. डायरीच्या पानांवर तिने तिच्या भावनाही लिहिल्या आहेत
युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या व्हॉट्स अॅप चॅटमधून धक्कादायक खुलासे समोर आल्यानंतर आता तपासादरम्यान ज्योती मल्होत्राची डायरी देखील समोर आली आहे. ज्योती मल्होत्राच्या या डायरीतून अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्याचे पाहायला मिळत आहे. धक्कादायक म्हणजे या डायरीतून ज्योती मल्होत्राचा कल पाकिस्तानकडे असल्याचं समजतंय. पाकिस्तानच्या लोकांकडून खूप प्रेम मिळाल्याचा उल्लेखही ज्योती मल्होत्राच्या डायरीत करण्यात आला आहे.
ज्योती मल्होत्राच्या घरातून सापडलेल्या डायरीत तिने काही आपले विचार आणि आठवणी लिहून ठेवल्या आहेत. ती देश आणि परदेशाशी संबंधित सर्व प्रकारची माहिती तिच्या डायरीत लिहून ठेवायची. या डायरीच्या सुमारे १० पानांवर अशाच प्रकारच्या नोंदी तिने केल्या आहेत. पाकिस्तान दौऱ्याचा उल्लेख तीन पानांवर करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. आठ पाने इंग्रजीत लिहिली आहेत, तर पाकिस्तानबद्दलची तिन्ही पाने हिंदीत लिहिली आहेत. बघा नेमकं काय-काय लिहिलंय़
