Pankaja Munde & Suresh Dhas Video : त्या आल्या, त्यांनी पाहिलं अन् निघून गेल्या; विधानभवन परिसरात नेमकं काय घडलं?

Pankaja Munde & Suresh Dhas Video : त्या आल्या, त्यांनी पाहिलं अन् निघून गेल्या; विधानभवन परिसरात नेमकं काय घडलं?

| Updated on: Mar 12, 2025 | 1:50 PM

राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा आठवा दिवस आहे. या आठव्या दिवशी विधानभवन परिसरात पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्याशी संबंधित एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

मुंबईतील विधानभवनात गेल्या तीन मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. नुकतंच दोन दिवसांपूर्वी राज्याचं अर्थसंकल्प सादर करण्यात आलं. अधिवेशन सुरू असताना सभागृह सुरू होण्यापूर्वी विधानभवन परिसरात अशा अनेक काही गोष्टी घडतात किंवा राजकीय वर्तुळातील नेत्यांचे किस्से समोर येतात ज्याची चांगलीच चर्चा होते. गेल्या काही दिवसापूर्वी अशाच एका व्हिडीओची चर्चा झाली होती. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानभवन परिसरात गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना रोखून पाहिलं असल्याचे समोर आले होतं. विधानभवन परिसरात आदित्य ठाकरे समोरून येत असातना गुलाबराव पाटील हे त्यांच्या रोखून पाहत असल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर आज अधिवेशनाच्या आठव्या दिवशीही असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. बीड जिल्ह्यातील आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस हे माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत असताना त्यांच्या मागून भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे आल्यात. मात्र पंकजा मुंडे यांनी सुरेश धस बोलताय हे पाहून त्या मागे फिरल्या. हा क्षण माध्यमांच्या कॅमेऱ्यात टिपला गेला. तर सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.

Published on: Mar 12, 2025 01:28 PM