सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच..; न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात नेमकं काय?

सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच..; न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात नेमकं काय?

| Updated on: Mar 21, 2025 | 1:03 PM

परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा पोलिसांनी केलेल्या मारहाणीतच झालेला असल्याचं आता कोर्टाने म्हंटलं आहे. याबद्दल न्यायदंडाधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहे.

परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीतच झाला असल्याच आता उघड झालं आहे. यावर आता न्यायालयाने देखील शिक्कामोर्तब केलं आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांवर ठपका ठेवण्यात आला आहे. परभणीच्या नवा मोंढा पोलीस ठाण्यात सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण करण्यात आल्याचा उल्लेख या अहवालात आहे. त्यामुळे सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचं अहवालात नमूद आहे. दरम्यान याबद्दलचा गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगाकडे सादर करण्यात आलेला आहे. आणि आयोगाने संबंधित पोलिसांना या प्रकरणी नोटिस बजावून उत्तर मागीतलं आहे.

3 महिन्यांपूर्वी परभणीत एका माथेफिरूने संविधानाची विटंबना केली होती. त्यानंतर आंबेडकरवादी संघटनांनी कारवाईची मागणी करत आंदोलन केलं होतं. या आंदोलनात सोमनाथ सूर्यवंशी देखील होते. आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेलं होतं. त्यानंतर त्यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता.

Published on: Mar 21, 2025 01:03 PM