Operation Sindoor : पिक्चर अभी बाकी है, ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्कर प्रमुखाच्या त्या ट्वीटनं पाकिस्तानला पुन्हा धडकी

Operation Sindoor : पिक्चर अभी बाकी है, ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्कर प्रमुखाच्या त्या ट्वीटनं पाकिस्तानला पुन्हा धडकी

| Updated on: May 07, 2025 | 2:12 PM

Manoj Narvane On Operation Sindoor : भारतीय लष्कराकडून दहशतवादाविरुद्धच्या आज केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईनंतर माजी लष्करप्रमुखांनी एक गूढ पोस्ट केली आहे. माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी एक ट्वीट करत पिक्चर अभी बाकी है... असं म्हटलं आहे.

गेल्या २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. हा हल्ला झाल्यानंतर भारताकडून पाकिस्तानविरोधात कठोर पाऊलं उचलण्यात आली. तर याच हल्ल्याला भारताकडून आज ऑपरेशन सिंदूरने प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांचे तळ एअर स्ट्राईकने उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी एक ट्वीट करत पाकिस्तानचं पुन्हा एकदा चांगलंच टेन्शन वाढवलं आहे. पिक्चर अभी बाकी है… असं माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय. जर पाकिस्तानने पुन्हा भारताला लक्ष्य करून संघर्ष वाढवण्याचा निर्णय घेतला तर असे आणखी हल्ले भारताकडून शक्य आहेत, असे माजी लष्करप्रमुखांनी संकेत दिले.

Published on: May 07, 2025 02:08 PM