Kokan Ganeshotsav | कोकणातील चाकरमान्यांसाठी मुंबईहून मडगावसाठी विशेष एसी ट्रेनचं नियोजन

Kokan Ganeshotsav | कोकणातील चाकरमान्यांसाठी मुंबईहून मडगावसाठी विशेष एसी ट्रेनचं नियोजन

| Edited By: | Updated on: Sep 02, 2021 | 1:19 PM

कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे. आता पश्चिम रेल्वे देखिल चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडणार आहे. पश्चिम रेल्वेने ब्रांदा ते मडगाव अशी एसी रेल्वे गाडीचं नियोजन केलंय.

कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे. आता पश्चिम रेल्वे देखिल चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडणार आहे. पश्चिम रेल्वेने ब्रांदा ते मडगाव अशी एसी रेल्वे गाडीचं नियोजन केलंय. ७ सष्टेंबरपासून हि विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे. खेड चिपळूण संगमेश्वर रत्नागिरी राजापूर वैभववाडी, कणकवली सिंधुदूर्गनगरी कुडाळ सांवतवाडी असे थांबे या गाडीला असणार आहेत.