PM Narendra Modi : काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड; सलग तिसऱ्या दिवशी बैठका सुरू

PM Narendra Modi : काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड; सलग तिसऱ्या दिवशी बैठका सुरू

| Updated on: May 05, 2025 | 4:34 PM

PM Modi Defence Meeting : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी बैठकांचा सिलसिला सुरू आहे.

सलग तिसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये आज मोठी बैठक घेतली आहे. देशाचे संरक्षणसचिव राजेश कुमार सिंग यांच्यासोबत पंतप्रधान मोदींची अर्धातास चर्चा झाली आहे. याआधीसुद्धा मोदींच्या नौदल, हवाईदलाच्या प्रमुखांसोबत बैठका झाल्या आहेत. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दिल्लीत हा बैठकांचा सिलसिला सुरू आहे. मोदींच्या निवासस्थानी या बैठका पार पडत आहेत. त्यामुळे सीमेवर काही तरी मोठं होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. काल दुपारी पंतप्रधान मोदींनी हवाई दलाचे प्रमुख ए. पी. सिंग यांच्याशी जवळपास 40 मिनिटं चर्चा केली होती. तर शनिवारी दुपारी नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी यांनीही मोदींची भेट घेतली.

दरम्यान, 30 एप्रिलला दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या एकूण 6 बैठका पार पडल्या. CCS, CCPA, CCEA कॅबिनेटसोबत मोदींनी बैठका घेऊन सविस्तर चर्चा केली आहे. पाकिस्तानविरोधात कारवाई करण्यासाठी मोदींकडून सशस्त्र दलांना मोकळा हात देण्यात आलेला आहे.

Published on: May 05, 2025 04:34 PM