PM Modi On RSS 100 years : जेव्हापासून संघ अस्तित्वात आला… संघाच्या शताब्दीनिमित्त PM मोदींचा विशेष लेख

PM Modi On RSS 100 years : जेव्हापासून संघ अस्तित्वात आला… संघाच्या शताब्दीनिमित्त PM मोदींचा विशेष लेख

| Updated on: Oct 02, 2025 | 11:36 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विशेष लेख लिहिला. त्यांनी स्वयंसेवकांचे अभिनंदन करत संघाचा देशप्रेम आणि सेवेचा वारसा अधोरेखित केला. पुढील शतकात संघ २0४७ पर्यंत विकसित भारतासाठी महत्त्वपूर्ण योगदान देईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नुकतीच आपली १०० वर्षांची गौरवशाली वाटचाल पूर्ण केली आहे. या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाच्या स्वयंसेवकांना शुभेच्छा देण्यासाठी एक विशेष लेख लिहिला आहे. आपल्या लेखात, पंतप्रधान मोदींनी संघाला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल स्वयंसेवकांचे अभिनंदन केले आणि संघ पुढील शतकातील प्रवासासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे नमूद केले आहे.

पंतप्रधान मोदींनी आपल्या लेखात संघाच्या स्थापनेपासूनच राष्ट्र हेच सर्वोच्च प्राधान्य राहिल्याचे म्हटले आहे. देशासाठी स्वयंसेवकांनी तुरुंगवासही भोगला आहे. स्वातंत्र्य संग्रामात संघाने असंख्य स्वातंत्र्यसैनिकांचे रक्षण केले आणि त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केले. स्वातंत्र्यानंतरही संघ राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सक्रियपणे सहभागी राहिला. संघाविरुद्ध अनेक कटकारस्थाने रचली गेली, आणि संघाला संपवण्याचे प्रयत्नही झाले. ऋषितुल्य परमपूज्य गुरुजींना खोट्या खटल्यात अडकवण्यात आले, तरीही स्वयंसेवकांनी कधीही कटुता बाळगली नाही. कारण त्यांना याची जाणीव होती की ते समाजापासून वेगळे नाहीत, तर समाज त्यांच्यापासूनच बनला आहे.

सुरुवातीपासूनच संघ देशभक्ती आणि सेवेचे प्रतीक राहिला आहे. एका नव्या संकल्पासह संघ आता पुढील शतकासाठी सज्ज झाला आहे. पंतप्रधान मोदींनी विश्वास व्यक्त केला की, २०२७ च्या विकसित भारताच्या निर्मितीसाठी संघाचे प्रत्येक योगदान देशाला ऊर्जा आणि प्रेरणा देईल. या निमित्ताने, त्यांनी पुन्हा एकदा प्रत्येक स्वयंसेवकाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Published on: Oct 02, 2025 11:36 AM