मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!

| Updated on: May 15, 2024 | 4:37 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज संध्याकाळी मुंबईतील घाटकोपर इथल्या एलबीएस रोडवर रोड शो होणार आहे. त्यामुळे संपूर्ण घाटकोपर आज भगवंमय झाल्याचे पाहायला मिळत आहे. घाटकोपर परिसरात संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोच्या आधी मुंबईकरांसाठी ही मोठी बातमी आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईतील जागृती नगर आणि घाटकोपर मेट्रो स्थानकांदरम्यान आज बुधवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून मुंबई मेट्रो सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवली जाणार आहे. तर मुंबई मेट्रो वनकडून प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज संध्याकाळी मुंबईतील घाटकोपर इथल्या एलबीएस रोडवर रोड शो होणार आहे. त्यामुळे संपूर्ण घाटकोपर आज भगवंमय झाल्याचे पाहायला मिळत आहे. घाटकोपर परिसरात संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोच्या आधी मुंबईकरांसाठी ही मोठी बातमी आहे. मुंबईतील घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो सेवा पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये मोठी कनेक्टिव्हिटी मुंबईकरांना देत असते. दररोज तीन लाखांहून अधिक प्रवासी मेट्रो सेवेचा वापर करतात. त्यामुळे ही बातमी मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची आहे.

Published on: May 15, 2024 04:37 PM