Cyrus Mistry | सायरस मिस्त्रींच्या अपघातासाठी ‘ही’ कारणं? पोलीस अहवाल काय सांगतो?

| Updated on: Sep 21, 2022 | 10:03 AM

पोलीस विभागातर्फेही अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास करण्यात आला. पोलिसांनी त्यांच्या अहवालात महामार्गावरील त्रुटींवर बोट ठेवलंय.

Follow us on

मुंबईः टाटा ग्रुपचे (Tata Group) माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील तपासात पोलीस अहवालात काही बाबी उघड झाल्या आहेत. महामार्गावरील एनएचएआयने (NHAI) केलेल्या त्रुटींवर या अहवालात बोट ठेवण्यात आलंय. हा महामार्ग तीन लेनचा असतानाही प्रत्यक्षात तो दोनच लेनचा करण्यात आलाय. तसेच या मार्गावर चालकांनी सावधानता बाळगावी, याकरिता सूचना फलकही लावण्यात आलेले नाहीत. रस्ता दुभाजक आणि पुलावर पिवळे ब्लिंकर्सदेखील लावण्यात आलेले नाहीत, असं पोलिसांच्या अहवालात नमूद करण्यात आलंय. 5 सप्टेंबर रोजी सायरस मिस्त्री यांचा पालघर जवळ अपघाती मृत्यू झाला. ते ज्या गाडीत बसले होते, त्या मर्सिडीज बेंझमध्ये काही बिघाड होता का, यादृष्टीनेही खास जर्मनीतील पथकाने तपास केला. तसेच राज्यातील पोलीस विभागातर्फेही अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास करण्यात आला. पोलिसांनी त्यांच्या अहवालात महामार्गावरील त्रुटींवर बोट ठेवलंय.