Pratap Sarnaik | प्रताप सरनाईकांवर सरकार मेहरबान नेमकं प्रकरण काय?

Pratap Sarnaik | प्रताप सरनाईकांवर सरकार मेहरबान नेमकं प्रकरण काय?

| Edited By: | Updated on: Jan 14, 2022 | 8:04 PM

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या इमारतीचा दंड माफ करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. कुणाही आमदाराच्या व्यक्तिगत हिताचा असा निर्णय घेण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल अशी चर्चा मंत्रालयातील प्रशासनात केली जात आहे. त्यामुळे या निर्णयावर आत्ता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

ठाणे : शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांच्या छाबय्या विहंग गार्डन इमारतीचा दंड माफ करण्याचा प्रस्ताव काल मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे सरनाईक यांच्या या ईमारतीला महापालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा असून त्यावर आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या इमारतीचा दंड माफ करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. कुणाही आमदाराच्या व्यक्तिगत हिताचा असा निर्णय घेण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल अशी चर्चा मंत्रालयातील प्रशासनात केली जात आहे. त्यामुळे या निर्णयावर आत्ता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.