दादांच्या खात्याबाबत लवकरात लवकर निर्णय? मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नेत्यांची वर्षा बंगल्यावर जवळपास सव्वा तास बैठक झाली आहे.
राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा बंगल्यावर जवळपास सव्वा तास बैठक झाली आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर अजित पवार यांच्याकडे असलेल्या खात्यांबाबत देखील लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी या नेत्यांनी केली आहे.
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर आता राष्ट्रवादीत हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान त्यांच्यात झालेल्या चर्चेचा सारांश प्रफुल्ल पटेल यांनी मिडियाशी बोलताना सांगितला. अजित पवार यांच्याकडे असलेल्या खात्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी लवकर निर्णय घ्यावा याची मागणी करण्यात आली असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
