Pratibha Shinde | संसदेत कायदा मागे घेईपर्यंत लढण्याचा निर्धार : प्रतिभा शिंदे

| Updated on: Nov 28, 2021 | 1:37 PM

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्यावतीनं आझाद मैदानात आज शेतकरी कामगार महापंचायतीचं आयोजन करण्यात आलं आहे. ह्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि शेत मजूर आझाद मैदानावर दाखल होत आहेत.

Follow us on

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्यावतीनं आझाद मैदानात आज शेतकरी कामगार महापंचायतीचं आयोजन करण्यात आलं आहे. ह्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि शेत मजूर आझाद मैदानावर दाखल होत आहेत. संयुक्त किसान मोर्चाच्यावतीनं 50 हजारच्या जवळपास लोकं दाखल होतील असा दावा करण्यात आला आहे. लखीमपूर येथे शहीद झालेल्या शेतकऱ्यांचे अस्थिकलश राज्यभरात मानवंदना देण्यासाठी फिरवण्यात आले असून ते महापंचायत संपल्यानंतर आज संध्याकाळी गेट वे आॅफ इंडिया येथील समुद्रात विसर्जित करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्ष हे काय ते संसदेत मागे घेईपर्यंत तसेच शेतकरी ,कामगार ,विद्यार्थी ,मागास वर्गीय अशा विविध समूहांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत लढण्याचा निर्धार करण्यासाठीही महापंचायत होत आहे, अशी माहिती प्रतिभा शिंदे यांनी दिली आहे.  महा पंचायतीला मार्गदर्शन करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाचे राकेश टीकेत सह इतर राष्ट्रीय किसान नेते देखील उपस्थित राहणार आहेत.