Pune Crime : स्वारगेट बलात्कार प्रकरण; आरोपीला तत्काळ अटक करण्याच्या मुरलीधर मोहोळ यांच्या सूचना

Pune Crime : स्वारगेट बलात्कार प्रकरण; आरोपीला तत्काळ अटक करण्याच्या मुरलीधर मोहोळ यांच्या सूचना

| Edited By: | Updated on: Feb 26, 2025 | 3:08 PM

Murlidhar Mohol : पुण्यातील स्वारगेट परिसरात एका 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये नराधमाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेतील आरोपीला अटक करण्याच्या सूचना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पोलीस आयुक्तांना केल्या आहेत.

पुणे स्वारगेट परिसरात तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला तत्काळ अटक करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना केलेल्या आहेत. माझ्या शहरातील कायदा सुव्यवस्था आम्ही बिघडू देणार नाही, अशी प्रतिक्रिया मोहोळ यांनी यावेळी दिली आहे.

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आता सर्व स्तरांतून निषेध व्यक्त केला जात असून आरोपीला अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पुणे शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. तसंच राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील पोलीस आयुक्तांना या प्रकरणी तत्काळ आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

Published on: Feb 26, 2025 03:08 PM