Pune Crime : पुणे अत्याचार प्रकरण; गुन्हेगारचा तपास लागलाय – पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavhan : पुणे येथे स्वारगेट बस स्थानकात झालेल्या तरुणीवरील अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारचा तपास लागलेला आहे, असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.
पुणे अत्याचार प्रकरणातील गुन्हेगाराचा तपास लागलेला आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसंच राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळत चालली आहे, असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.
पुण्याच्या स्वारगेट परिसर बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. प्रकरणातील आरोपीला अटक करण्याची मागणी जोर धरत असतानाच राजकीय वर्तुळातून देखील या घटनेवर प्रतिक्रिया उमटतांना दिसत आहे. कॉंग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील या प्रकरणावर बोलताना राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली असल्याचं म्हटलं आहे. तसंच या प्रकरणातील गुन्हेगाराचा तपास लागलेला असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. या आरोपीवर याआधी देखील 5-6 गुन्हे दाखल आहेत. त्याला जामीनावर सोडण्यात आलेलं आहे. अशी वस्तुस्थिती असेल तर आशा कट्टर गुन्हेगारांकडे बघण्याचा न्यायव्यवस्थेचा दृष्टिकोन बदलला गेला पाहिजे, असं देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.
