धर्म म्हणजे पूजा नव्हे तर धर्म म्हणजे…; मोहन भागवत यांनी अर्थ उलगडून सांगितला…

| Updated on: Mar 05, 2023 | 7:31 AM

नीतिमान असा आपला देश होता. मात्र मधल्या काळात झालेल्या आक्रमणामुळे हा बदल झाला, असं मोहन भागवत म्हणालेत. पाहा...

Follow us on

पुणे :  सरसंघचालक मोहन भागवत यांनी धर्माचा अर्थ उलगडून सांगितला आहे. “धर्म म्हणजे पूजा नव्हे धर्म म्हणजे कर्तव्य आहे. माणुसकीचा धर्म सेवा हाच आहे”, असं मोहन भागवत म्हणाले आहेत. मोहन भागवत यांनी राजकीय नेत्यांचाही समाचार घेतलाय. निवडणूक काळातील नेते आणि निवडून आल्यावर होणारे बदल त्यांनी अधोरेखित केलेत. सेवा विषयावर बोलत असताना राजकारण्यांवर त्यांनी टीका केलीय. “दर चार-पाच वर्षांनी सेवेची संधी द्या म्हणणारे येतात. पुढे महिन्यानंतर गायब होतात. पुन्हा पाच वर्षांनी सेवेची संधी द्या म्हणत येतात”, असं भागवत म्हणालेत.