Bazar Samiti Election Result 2023 : पवारांच्या बारामतीत कोण आघाडीवर? राष्ट्रवादीच्या उमेदवारांची काय स्थिती?

| Updated on: Apr 29, 2023 | 1:11 PM

Agricultural Produce Market Committee Election Result 2023 : बाजार समितीत पवारांची सत्ता कायम राहणार? पाहा व्हीडिओ...

Follow us on

बारामती, पुणे : राज्यात आत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल लागतोय. अशात शरद पवार यांच्या बारामतीत काय स्थिती आहे. जाणून घेऊयात… बारामतीत राष्ट्रवादीने गड राखण्याची शक्यता दाट आहे. कारण राष्ट्रवादीचे 17 उमेदवार आघाडीवर आहेत. पुरंदर, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीत महविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर दौंडमध्ये बाजारसमितीच्या निकालावेळी खासदार संजय राऊत यांच्या विरोधात घोषणबाजी करण्यात आली. राहुल कुल यांच्या समर्थकांनी ही घोषणाबाजी केलीये. आमदार राहुल कुल यांचे पॅनल आघाडीवर असल्याने कार्यकर्त्यांचा जल्लोष दौंडमध्ये पाहायला मिळतोय. तर इंदापूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचे पॅनल निर्विवाद विजयी आघाडीवर आहे.