Pune Crime : पुणे अत्याचार प्रकरण; राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक | Video

Pune Crime : पुणे अत्याचार प्रकरण; राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक | Video

| Edited By: | Updated on: Feb 27, 2025 | 12:24 PM

NCP Sharad Pawar Group : स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकारी नेत्यांनी स्वारगेट चौकात आंदोलन केलं. प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं.

पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून आंदोलन करण्यात आलं. प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्वारगेट चौकात हे आंदोलन करण्यात आलं आहे.

पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना काल पहाटे घडली. त्यानंतर नागरीक आणि विरोधी पक्षाकडून या घटनेचा निषेध व्यक्त करत कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी तत्काळ अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज पुण्यातील स्वारगेट चौकात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर ‘आमचा आक्षेप पुणे पोलीस किंवा महाराष्ट्र पोलिसांवर नाही. कोयता गॅंगपासून इतर सर्व आरोपी हे राजकीय पक्षांशी संबंधित आहे. कालच्या घटनेतील आरोपीचा हवेली येथील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांसोबतचा एक फोटो समोर आला आहे. त्यामुळे गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम सत्ताधारी करतात, असा आरोप प्रशांत जगताप यांनी यावेळी बोलताना केला आहे.

Published on: Feb 27, 2025 12:05 PM