TET Exam | टीईटी घोटाळा, तुकाराम सुपेचा पाय खोलात; आरोपीकडून आतापर्यंत 3 कोटी 15 लाख रुपये जप्त

| Updated on: Dec 24, 2021 | 3:27 PM

पुणे पोलिसांनी(Pune Police) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निलंबित आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) याच्या कार्यालयातून गेल्या चोवीस तासात 50 लाखांपेक्षा अधिक रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी दिली आहे.

Follow us on

पुणे पोलिसांनी(Pune Police) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निलंबित आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) याच्या कार्यालयातून गेल्या चोवीस तासात 50 लाखांपेक्षा अधिक रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी दिली आहे. टीईटी परीक्षा गैरव्यवहार (TET Exam Scam) प्रकरणी पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेच्या परिचिताकडून काल रात्री 25 लाख रुपये जप्त केले होते. त्यानंतर आणखी एकदा त्याच्या कार्यालयावर छापा टाकत पुणे पोलिसांनी 33 लाख रुपये जप्त केले आहेत. पुणे पोलिसांना 24 तासात तुकाराम सुपेकडून 58 लाख रुपये जप्त करण्यात यश आलं आहे. यापूर्वी एक कोटी 58 लाख आणि 90 लाख सुपेकडून आणि त्याच्या नातेवाईकांकडून जप्त करण्यात आले होते. तुकाराम सुपेकडून आतापर्यंत 3 कोटी 87 लाख रुपये आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.