Rahul Gandhi : राहुल गांधींचा देवेंद्र फडणवीसांवर मोठा आरोप

Rahul Gandhi : राहुल गांधींचा देवेंद्र फडणवीसांवर मोठा आरोप

| Updated on: Jun 24, 2025 | 1:54 PM

Rahul Gandhi Allegations On Devendra Fadnavis : राहुल गांधी यांनी मतदारांच्या वाढलेल्या संख्येवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात गेल्या 5 महिन्यात 8 टक्के मतदार वाढले असा आरोप कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. निवडणूक आयोगावर राहुल गांधी यांनी मोठा आरोप केला आहे. काही बूथवर 20 ते 50 टक्के मतदार वाढले असा आरोपही राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आला आहे.

यावर निवडणूक आयोग मौन बाळगून का आहे? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाचा दाखला देत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. फडणवीस यांच्या मतदारसंघात 5 महिन्यात 8 टक्के मतदार वाढले. म्हणजेच लोकसभेनंतर विधानसभेसाठी 8 टक्के मतदार वाढले. काही बूथवर 20 ते 50 टक्के मतदार वाढले. काही अनोळखी मतदारांची नोंद करण्यात आली आहे, असा आरोप करत निवडणूक आयोग यावर गप्प का? असा प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केला आहे.

Published on: Jun 24, 2025 01:54 PM