Rahul Gandhi | नागरिकांचा निकालाचा नम्रपणे स्विकार करतो आणि यातून धडा घेऊ

Rahul Gandhi | नागरिकांचा निकालाचा नम्रपणे स्विकार करतो आणि यातून धडा घेऊ

| Edited By: | Updated on: Mar 10, 2022 | 9:15 PM

आम्ही जनादेश नम्रपणे स्विकारतो, ज्यांना जनादेश मिळाला त्यांचे अभिनंदन, काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि स्वयंसेवकांनी कठोर परिश्रम घेतले, त्यांच्या समर्पणाबद्दल मी त्यांचे आभार मानतो असे राहूल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मुंबई : अखेर पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल (Assembly Election Result 2022) जवळपास स्पष्ट झाले आहेत. पाच राज्यांपैकी चार राज्यात भाजपाने (BJP) बाजी मारली आहे. तर पु्न्हा एकदा काँग्रेसला (Congress) पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेसला आपने धोबीपछाड दिला आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्री चन्नी यांचा तर दोनही ठिकाणी पराभव झाला आहे. काँग्रेसचे पंजाब प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना देखील पराभवाचा धक्का बसला आहे. उत्तराखंडमध्ये देखील हीच स्थिती आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते हरिश रावत यांचा पराभव झाला आहे. दरम्यान या सर्व घडामोडीवर राहूल गांधी यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही जनादेश नम्रपणे स्विकारतो, ज्यांना जनादेश मिळाला त्यांचे अभिनंदन, काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि स्वयंसेवकांनी कठोर परिश्रम घेतले, त्यांच्या समर्पणाबद्दल मी त्यांचे आभार मानतो असे राहूल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.