Raigad Rain : नागोठण्यात अंबा नदीचं रौद्ररूप; कोळीवाडा परिसर पाण्याखाली

Raigad Rain : नागोठण्यात अंबा नदीचं रौद्ररूप; कोळीवाडा परिसर पाण्याखाली

| Updated on: Jun 19, 2025 | 3:07 PM

Nagothane Rain Updates : रायगड जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरु असून यामुळे अंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. हे पाणी आता नागरिकांच्या घरात घुसायला सुरुवात झाली आहे.

रायगड जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. आज रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रायगडच्या नागोठणेमध्ये देखील सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील कोळीवाडा परिसरात पुर स्थिती निर्माण झाली आहे. नागोठणे शहर जलमय झाले असून घरांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे.

घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा परिणाम नागोठणे परिसरातील कोळीवाडा येथे दिसून आला आहे. येथील रस्ते जलमय झाले असून, काही घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. परिस्थिती बिघडण्याच्या शक्यतेमुळे स्थानिक प्रशासनाने नागोठणेत रस्त्यावर बोटी तयार ठेवल्या आहेत, जेणेकरून आवश्यकता भासल्यास बचाव कार्य करता येईल. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील अंबा नदीने रौद्ररूप धारण केलेलं आहे. या नदीचं पाणी आता कोळीवाडा भागातील लोकांच्या घरात शिरलं आहे. त्यामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर या पाण्याच्या पातळीत अधिक वाढ होण्याची शक्यता असल्याने या ठिकाणच्या नागरिकांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

Published on: Jun 19, 2025 03:07 PM