Babasaheb Purandare | राज ठाकरे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या भेटीला
Babasaheb Purandare | राज ठाकरे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या भेटीला

Babasaheb Purandare | राज ठाकरे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या भेटीला

| Edited By: | Updated on: Jul 29, 2021 | 12:22 PM

 शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (BabaSaheb Purandare) आज शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने पुण्याच्या कात्रजमध्ये एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांनी उपस्थिती लावली.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (BabaSaheb Purandare) आज शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने पुण्याच्या कात्रजमध्ये एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांनी उपस्थिती लावली. राज ठाकरे यांनी सर्वप्रथम बाबासाहेब पुरंदरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचा सन्मान केला. तसंच त्यांच्या पायावर डोकं ठेऊन त्यांचा आशीर्वादही घेतला. (Raj Thackeray Greets Shivshahir Babasaheb Purandare)

बाबासाहेब पुरंदरेंचं शंभरीत पदार्पण

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज 99 वाढदिवस… आज ते 100 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या सोहळ्याचं आयोजन टाळत त्यांच्या वाढदिवसानिमित्त छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलंय. या कार्यक्रमाला राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली.

Published on: Jul 29, 2021 12:22 PM