आमदार फोडण्यासाठी 200 कोटी 2000 कोटी कर्ज काढून आणले? राज ठाकरेंकडून गौप्यस्फोट

आमदार फोडण्यासाठी 200 कोटी 2000 कोटी कर्ज काढून आणले? राज ठाकरेंकडून गौप्यस्फोट

| Updated on: Jan 08, 2026 | 10:07 AM

राज ठाकरे यांनी पन्नास खोके हा विनोद नसून ४० आमदारांसाठी २००० कोटींचा व्यवहार झाल्याचे म्हटले आहे. हे पैसे कुठून आले, ते बँकेतून कर्ज म्हणून आणले होते का, की भ्रष्टाचारातून आले, असा उपरोधिक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. महापालिकेतील कथित ३ लाख कोटींच्या भ्रष्टाचारावरही त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले.

राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत असलेल्या पन्नास खोके प्रकरणावर भाष्य करताना, हा केवळ विनोदाचा भाग नसून त्यामागे गंभीर आर्थिक व्यवहार असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या मते, ४० आमदार फोडण्यासाठी २००० कोटी रुपये खर्च झाले आहेत. “४० आमदारांचे २००० कोटी झाले. हे कुठून आले? कसे आले? भ्रष्टाचारातून, घोटाळ्यातून.” असा थेट सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

या संदर्भात, २००० कोटी रुपये बँकेतून कर्ज काढून आणले नव्हते ना, असा उपरोधिक प्रश्न विचारत त्यांनी या पैशांच्या स्त्रोतावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. यापूर्वी महापालिकेत ३ लाख कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होता. त्यावरही ठाकरे यांनी महापालिकेत एवढे पैसे असतात का आणि जर एवढे पैसे असतील, तर मग आमदार पन्नास-पन्नास कोटींना का पळून गेले, असा सवाल करत संबंधित आरोपांची सत्यता तपासण्याची मागणी केली. हे संपूर्ण प्रकरण भ्रष्टाचाराशी संबंधित असल्याचा त्यांचा आरोप आहे.

Published on: Jan 08, 2026 10:07 AM