Raj Thackeray : रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा कशाला मागत आहात? उलट.. ; लोकल ट्रेनच्या अपघातावर राज ठाकरे संतापले

Raj Thackeray : रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा कशाला मागत आहात? उलट.. ; लोकल ट्रेनच्या अपघातावर राज ठाकरे संतापले

| Updated on: Jun 09, 2025 | 2:46 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुणे दौऱ्यावर असताना दिवा - मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या लोकलच्या अपघातावर संताप व्यक्त केला आहे.

रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा कशाला मागत आहात? उलट त्यांनी जावं तिकडे. अपघात झाला तिथे जाऊन रेल्वे मंत्र्यांनी बघावं. काय सुधारणा करायला हव्यात त्या कराव्या, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिवा – मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या लोकलच्या अपघातावर संताप व्यक्त केला आहे. राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत लोकलच्या अपघातावर भाष्य केलं आहे.

यावेळी राज ठाकरेंनी पत्रकारांना देखील चांगलचं धारेवर धरलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार याच्या जेवढ्या बातम्या लावल्या, तेवढा हा अपघाताचा मुद्दा उचलून धरणार आहात का? मुंबईत मेट्रो, मोनो सर्व आहे. पण गाड्यांचे रजिस्ट्रेशन थांबलंय का? गेले अनेक दिवस राज ठाकरे – उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार याच्या जितक्या बातम्या लावल्यात, तेवढा काळ तुम्ही रेल्वे अपघाताच्या बातम्या लावणार आहात का? आपण कशाला महत्त्व द्यायचं, कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं हेच या सर्व गोष्टींमध्ये समजेना झालं आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

Published on: Jun 09, 2025 02:45 PM