Chiplun च्या पुरात अडकलेल्या 1800 लोकांचं रेस्क्यू, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Chiplun च्या पुरात अडकलेल्या 1800 लोकांचं रेस्क्यू, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

| Edited By: | Updated on: Jul 23, 2021 | 8:25 PM

खेड तालुक्यातील बिरमणी येथे दरड कोसळून 2 जण दगावले आहेत. चिपळूणमध्ये एनडीआरएफच्या 4 टीम दाखल झाल्या आहेत. आर्मी आणि नेव्हीच्या प्रत्येकी 4 टीम चिपळूणमध्ये पोहचत असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती दिली.

चिपळूण : चिपळूणमध्ये महापुराने हाहाकार माजवला आहे. पुरात अडकलेल्या 1800 लोकांना रेस्क्यू करण्यात आलं आहे. चिपळूणमधल्या पोसरे -बौद्धवाडी येथे 17 जण ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती आहे. तर खेडमधल्या धामणंदमध्ये 17 घरांवर दरड, काही कुटुंब अडकल्याची भिती वर्तविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. बी एन पाटील यांनी ही माहिती दिली आहे. खेड तालुक्यातील धामणंदमधल्या दुर्घटनेसाठी आर्मीला पाचारण करण्यात आले आहे. खेड तालुक्यातील बिरमणी येथे दरड कोसळून 2 जण दगावले आहेत. चिपळूणमध्ये एनडीआरएफच्या 4 टीम दाखल झाल्या आहेत. आर्मी आणि नेव्हीच्या प्रत्येकी 4 टीम चिपळूणमध्ये पोहचत असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती दिली.