tv9 Marathi Special Report | BMCElection | निकाल मुंबईत, जल्लोष आसाममध्ये, काय घडलं?

tv9 Marathi Special Report | BMCElection | निकाल मुंबईत, जल्लोष आसाममध्ये, काय घडलं?

| Updated on: Jan 19, 2026 | 11:50 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आसाममधून भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांचं अभिनंदन केलंय. 'विजय मुंबईमध्ये झालाय पण जल्लोष हा आसाममध्ये होतंय' असंही मोदी म्हणाले.

महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुका पार पडल्या आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेवर भाजपने आपला विजय मिळवला. संपूर्ण महाराष्ट्रात भाजप कार्यकर्त्यांनी विजयचा गुलाल उधळत एकमेकांना शुभेच्छा दिल्या याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आसाममधून भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांचं अभिनंदन केलंय. ‘विजय मुंबईमध्ये झालाय पण जल्लोष हा आसाममध्ये होतंय’ असंही मोदी म्हणाले. याचवेळी मोदींनी काँग्रेस नेतृत्वावर देखील टीका केली. ज्या मुंबईत काँग्रेसचा जन्म झाला तिथेच आज काँग्रेस चौथ्या नंबरवर आहे असा टोला मोदींनी काँग्रेसवर लगावला आहे. काँग्रेसने देशाचा भरोसा हरवलाय असंही मोदी म्हणाले.

Published on: Jan 19, 2026 11:50 AM