Vaishnavi Hagawane Case : रूपाली चाकणकरांनी रोहिणी खडसेंचं ‘ते’ प्रकरण काढलं बाहेर, दोघींमध्येच जुंपली
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणावरून राज्यात एकच संतापाचं वातावरण असताना पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यातच आरोप-प्रत्यारोप होताना दिसतंय.
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणावरून पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यातच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. वैष्णवी हगवणेंच्या जावेने तक्रार दाखल केली होती तेव्हाच कारवाई व्हायला हवी होती, असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे. तर रुपाली चाकणकरांवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये? असा सवालच रोहिणी खडसे यांनी यांनी करत रूपाली चाकणकरांना डिवचलं आहे. दरम्यान, रोहिणी खडसे यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर जोरदार निशाणा साधल्यानंतर आता रूपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसे यांचं एक प्रकरण बाहेर काढलं आहे.
रोहिणी खडसे यांचे पीए नाफडे यांच्या पत्नीची महिला आयोगाकडे तक्रार आहे. रोहिणी खडसे यांच्याकडून धमकी अशी पीए नाफडे यांच्या पत्नी तक्रार असल्याचे रूपाली चाकणकर म्हणाल्या तर नाफडे प्रकरणात काय कारवाई केली हे खडसेंनी सांगावं? असा प्रतिसवालच चाकणकरांनी केला आहे.
