Russia vs America : डेड हँडला अमेरिका इतकी का घाबरते? काय आहे हे?
रशियाचे माजी राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव यांनी डेड हँडचा उल्लेख करताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खवळले. अशा वक्तव्यांचा सामना करण्यासाठी मी दोन अण्वस्त्र पाणबुड्या तैनात करण्याचे आदेश दिले आहेत, असा इशाराच ट्रम्प यांनी दिला आहे.
मी सत्तेवर आल्यानंतर रशिया-युक्रेनमधील युद्ध लगेच थांबवेन, असं आश्वासन डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिलं होतं. परंतु ट्रम्प यांना अद्याप हे शक्य झालेलं नाही. युक्रेनला नाटोमध्ये सहभागी होण्याची घाई झाली होती, म्हणूनच व्लादिमीर पुतिन यांनी युद्ध केलं होतं. अमेरिकेच्या इतक्या धमक्यांनंतरही हे युद्ध अद्याप सुरूच आहे. अमेरिका आणि रशियामध्ये निर्माण झालेल्या या तणावाने आता टोक गाठलं आहे. दुसरीकडे भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याची गोष्ट ट्रम्प यांना खुपतेय. त्यामुळे त्यांनी भारतावरही निशाणा साधलाय. रशिया आणि भारत मिळून आपली डेड इकॉनॉमी उद्ध्वस्त करतील, असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं होतं. त्यावर रशियाचे माजी राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव यांनीसुद्धा सडेतोड प्रतिक्रिया दिली. याविषयी सविस्तर या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात..
